बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मालेगाव , गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (16:34 IST)

वाढदिवशीच केला मुलीचा आई बापाने खून, हे आहे कारण

मालेगावमध्ये झालेल्या नेहा चौधरीच्या मृत्यूनं वेगळं वळण घेतलंय. नेहाची तिच्याच आईवडिलांनी हत्या केल्याचं उघड झालंय. मालेगाव शहरातील कलेक्टरपट्टा भागातील नेहा शरद चौधरी (18) हिचा आई- वडिल आणि चुलत भावाने खून केल्याची घटना घडली. हा प्रकार केला प्रेम प्रकरणाला विरोधातून झाला. या शहरातील ऑनर किलिंग प्रकरणाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही सोमवारी (ता.1) अंत्यसंस्कारापूर्वी श्रीरामनगर वैकुंठधामात ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी नेहाचा मुतदेह देखील ताब्यात घेतला. निनावी दूरध्वनी व शवचिकित्सेनंतर आला खूनाचा प्रकार उघडकीस आला. कारण एका निवानी फोन कॉलवरून पोलिसांना तिच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सूत्रं हलवत वेळीच नेहाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी नेहाचे आई-वडील आणि तिच्या चुलत भावाला अटक केली असून पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे.