शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (22:45 IST)

दारू दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला  दौऱ्यावर होते.माजी दिवंगत आमदार सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात फडणवीस आले होते.त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.‘जेवढी गर्दी बारमध्ये होते,त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते.सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे,अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘आम्हा हिंदूंचे तेहतीस कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो.परंतु,अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब नागरिकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरं उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे.तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता. परंतु, मंदिरे बंद ठेवता, असं फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.