सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (10:11 IST)

पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी - उद्धव ठाकरे

The patriarch is Bhondugiri - Uddhav Thackeray Maharashtra News Regional Marathi News  Webdunia Marathi
"नुकताच पितृपक्ष होऊन गेला. या काळात चांगलं काम करू नये, असं म्हणतात. पण मला जेव्हा एखादी गोष्ट करायची असते आणि पितृपक्ष असतो. त्यावेळी तो वडिलांनीच स्थापन केल्याचं मी सांगतो. वडिलांनी स्थापन केलेला पक्ष हा पितृपक्ष नाही का, त्यामुळे ही सर्व भोंदूगिरी आहे", असं स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन नियतकालिकातील लेखसंग्रह ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. सचिन परब यांनी प्रबोधनकारांच्या लेखांच्या ३ खंडांचं संपादन केलं असून मराठी साहित्य मंडळाने याचं प्रकाशन केलंय. यावेळी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचंही लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
 
"माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे नास्तिक नव्हते. त्यांची देवीवर प्रचंड श्रद्धा होती. पण ढोंगीपणावर लाथ मार असं ते म्हणत. त्यांनी केवळ हे लिहून सोडून दिलं नाही, तर जिथं जिथं ढोंग दिसलं तिथं त्यांनी लाथा मारल्या," असं ठाकरे यांनी म्हटलं.