शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (20:13 IST)

सिल्व्हर पॅपिलेट मासा आता राज्य मासा म्हणून ओळखला जाईल

राज्याचा राज्य प्राणी शेकरू आणि राज्य पक्षी म्हणून हरियाल ओळखला जातो.आता सिल्वर पॉपलेट मासाला देखील  राज्य माशाचा दर्जा देण्याची घोषणा मत्स्यपालन, पशुपालन आणि डेरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयाच्या संदर्भात राष्ट्रीय परिषदेत मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 
 
पॉपलेट माशाला राज्याचा माशा म्हणून दर्जा मिळावा जेणे करून पॉपलेट माशाच्या प्रजातीचे जतन व्हावे.अशी मागणी मच्छिमार संघटनांनी केली होती. पॉपलेट माशाचे महत्त्व जमल्यावर राज्य सरकारने टपाल तिकीट देखील जारी करण्यात आले आहे. 

पॉपलेट माशा हा कोकणच्या किनारपट्टीवर हर्णे ते पालघर दरम्यान मोठ्या प्रमाणात आढळतो. काहीसा पांढरा आणि सिल्व्हर रंगाचा तसेच चवीला उत्तम असल्यामुळे त्याची मागणी बाजारपेठेत खूप असते.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पापलेट व्यापारातील बदलासह मासेमारी पद्धतीतील बदलामुळे लहान माशांच्या पापलेट माशांची बेछूट मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भारताच्या वायव्य भागातील पापलेट माशांच्या साठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे.पापलेट ही मस्त्य प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी प्रबोधन नियमन होणे या दृष्टिकोनातू सिल्वर पॉमफ्रेटला (पापलेट/सरंगा) महाराष्ट्राचा “राज्य मासा” म्हणून घोषित करण्याच्याची मागणी मासेमार संघटनेकडून करण्यात आली होती. 
 
हा माशा सरंगा  म्हणून देखील ओळखला जातो.या माशाचा निर्यात राज्यातून सर्वाधिक होते. पण सध्या या माशाचे उत्पादन घेतले असून हा माशा दुर्मिळ होत आहे. 

मत्स्य प्रजातीचे जतन करण्यासोबतच सागरी परिसंस्थेचे रक्षण, लहान माशांच्या मासेमारीला आळा घालण्यासाठी आणि शाश्वत मासेमारी पद्धतीने प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या माध्यमातून सिल्वर पापलेटच्या राज्य मत्स्य स्थितीवर भर दिल्यास शाश्वत मासेमारी पद्धतीने चालना मिळण्याची शक्यता वर्तवली आहे . म्हणून  सिल्वर पापलेटला महाराष्ट्राचा ‘राज्य मासा’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit