गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (21:11 IST)

आम्ही ब्राह्मण आहोत, याचा आम्हाला गर्व आहे वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा

amruta fadnavis
अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. “आम्ही ब्राह्मण आहोत, याचा आम्हाला गर्व आहे,” असं त्या म्हणाल्या. सोमवारी नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होत्या.अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

“आम्ही ब्राह्मण आहोत. याचा आम्हाला गर्व आहे.आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आमच्यात कोणतीही कमतरता नाही. पण आम्हाला स्वत:चं मार्केटिंग करता येत नाही,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या.

“ देवेंद्र फडणवीस न मागता मुख्यमंत्री झाले. त्यांनी हे पद कधीच मागितलं नाही. त्यांची कार्यपद्धत, लोकसेवा पाहून मोदींनी आणि वरिष्ठांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असंही त्यांनी नमूद केलं.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor