तब्बल २३ वर्ष पोलीसांना गुंगारा देणा-या संशयीताला पोलीसांनी ठोकल्या बेडया
तब्बल २३ वर्ष तो पोलीसांना गुंगारा देणा-या संशयीताला पोलीसांनी गजाआड केले आहे. मारहाणीच्या गुह्यात या संशयीताला जामिनावर सोडण्यात आले होते. पण, तो फरार झाला होता. न्यायालयाच्या आदेशाने त्याला बेड्या ठोकण्यात विशेष पथकाला यश आले.
विकास मनोहर दाणी (५८ रा.आंबेडकरनगर,उपनगर) असे संशयिताचे नाव आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानक भागात १९९८ मध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्यात पोलीसांनी अटक केली होती. मनमाड रेल्वे न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले असता तो पसार झाला होता. नाशिक पुणे मार्गावरील बजरंग हौसिंग सोसायटीत राहणा-या संशयीताने आपले वास्तव्य बदलल्याने तो रेल्वे पोलीसांच्या हाती लागत नव्हता.
तब्बल २३ वर्ष रेल्वे पोलीसांना गुंगारा देत होता. पकड वॉरंट व समन्स बजावूनही तो हाती लागत नसल्याने अखेर न्यायालयाने त्यास हुडकून काढण्याचे आदेश रेल्वे पोलीसांना दिले होते. त्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बालाजी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक त्याच्या मागावर असतांनाच संक्रातीच्या (दि.१४) दिवशी तो आंबेडकरनगर भागात राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार हिरोहोंडा शोरूम पाठीमागील त्याच्या राहत्या घरात शिरून हवालदार संतोष उफाडे आणि विलास इंगळे यांनी त्यास बेड्या ठोकल्या.