बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2025 (14:23 IST)

मालाड मध्ये चोरी करण्यासाठी घरात शिरलेल्या चोराने महिलेचे चुंबन घेऊन पळ काढला

मुंबईतील मालाड मध्ये चोरी करण्यासाठी घरात शिरलेल्या चोऱ्याने चोरण्यासाठी काहीच मिळाले नाही तर त्याने घरातील महिलेचा चुंबन घेऊन पळ काढला. 

पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला करत आरोपीला अटक केली आहे. 
 सदर घटना मालाड मधील कुरार भागात 3 जानेवारी रोजी घडली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, महिला घरात एकटीच होती. चोरट्याने घरात शिरून आतून दार बंद केले आणि महिलेला सर्व मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम देण्यास सांगितले.

मात्र महिलेने घरात काहीच मौल्यवान वस्तू नसल्याचे सांगितले. या वर आरोपीने महिलेचे चुंबन घेऊन तिथून पळ काढला. 

महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दरोडा आणि विनयभंगाच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देखील त्याच भागात आपल्या कुटुंबियांसह राहतो. आरोपी सध्या बेरोजगार आहे. त्याच्या नावावर कोणताही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नाही. 
Edited By - Priya Dixit