1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :अहमदनगर , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:34 IST)

रस्त्यावरच महिलेची प्रसूती झाली

अहमदनगर जिल्ह्यात देवळाली प्रवरामध्ये कमल शिंदे ही महिला प्रसूतीसाठी ग्रामीण रूग्णालयात गेली होती. मात्र तिथे तिला दाखल करून घ्यायला प्रशासनानं नकार दिल्यामुळे महिलेची रस्त्यात प्रसूती झाली. 
 
महिलेच्या नातेवाईकांनी अनेक विनवण्या केल्या. पण ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर नाईलाजास्तव  या नातेवाईकांनी महिलेला खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र खासगी रुग्णालयात नेत असताना मध्येच रस्त्यात महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्यामुळे स्थानिक महिलांनी रस्त्यावरच कमल शिंदेची प्रसूती केली. रस्त्याच्या कडेला त्यांनी महिलेची प्रसूती केली. महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या प्रकरामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गरीब रुग्णांची ग्रामीण रुग्णालायातील कर्मचारी हेळसांड करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावेळी जर काही अघटित घडले असते तर त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न येथे याठिकाणी निर्माण होतो.