मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , मंगळवार, 14 जून 2022 (07:54 IST)

बहिणीस केलेल्या छेडछाडीबाबत जाब विचारल्याने महिलेवर तीन जणांनी केला कोयत्याने हल्ला

crime
विहीतगाव येथे बहिणीस केलेल्या छेडछाडीबाबत जाब विचारल्याने महिलेवर तीन जणांनी कोयत्याने हल्ला करुन तिला बेदम मारहाण केली. या हल्यात महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी महिलेचा भाऊ विशाल बाजीराव कदम (रा.पांडूरंगनगर,विहीतगाव) याने तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य चव्हाण,गणेश थोरात व ओमकार चव्हाण अशी महिलेस मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. या घटनेत नेहा युवराज पाटोळे ही महिला जखमी झाली असून नेहा पाटोळे या शनिवारी (दि.11) सायंकाळी विहीतगाव येथील महापालिका गार्डन मध्ये लहान मुलीस घेवून गेली होती. लहान मुलीस खेळवित असतांना तिची गाठ संशयितांशी पडली. यावेळी तिने आदित्य चव्हाण यास बहिणीची छेड का काढतो अशी विचारणा केली असता त्रिकुटाने तिला बेदम मारहाण केली. यावेळी चव्हाण याने तिच्या डोक्यात कोयत्याचा वार केल्याने ती जखमी झाली असून अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.