शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 13 मे 2022 (14:58 IST)

बापरे..!चोरट्यांनी तब्ब्ल एव्हढ्या लाखाचे गोडंतेलच नेले चोरून

oil thieves
नाशिकमध्ये आता चोरट्यांनी गोडे तेलाकडे मोर्चा वळवला आहे,नाशिकच्या पेठ रोड येथे चक्क चोरट्यांनी तेलाच्या डब्यांवर हात साफ केला असून ,लाखोंचा गोडतेलाचा माल चोरून नेला आहे.या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नाशिकच्या पेठ रोड इथल्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड गेट जवळ नाशिक मर्चंट बँकेच्या बाजूला जे एम ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे.चोरट्यांनी रात्रीच्यावेळी हे गोदाम फोडून येथून तब्ब्ल चार लाख, शहत्तर हजार ,पाचशे ऐंशी रुपये किमतीचे जेमिनी ,सनफ्लॉवर,फोरचुन ,मुरली अश्या विविध कंपन्यांच्या गोड तेलाचे लिटर आणि किलोचे असे एकूण १२५ डब्बे चोरट्यांनी चोरून नेले आहे,
 
तर अन्य देखील काही मालावर चोरट्यांनी हात साफ केला आहे.या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून गोड तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा गोड तेलाकडे वळवला आहे.या संपूर्ण प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपस करत आहे.