महावितरणच्या विद्युत सहायक पदभरतीबाबत झाला हा महत्त्वाचा निर्णय

dattatray bharne
Last Modified मंगळवार, 24 मे 2022 (21:23 IST)
महावितरण कंपनीच्या विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक व पदविकाधारक/ पदविधारक शिकाऊ अभियंता (वितरण/स्थापत्य) या पदांच्या भरती प्रक्रियेत शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण धोरण राबवावे. या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विद्युत सहायक पदभरतीसंदर्भात प्रतिक्षा यादीमध्ये समांतर आरक्षण लावून सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सु.ह.आंधळे, महावितरणचे महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, कक्ष अधिकारी पल्लवी पालांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले की, शासन सेवा प्रवेशासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे धोरण ठरविण्यात आले आहे. समांतर आरक्षण धोरणानुसार एखाद्या समांतर आरक्षण प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ते पद त्या-त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरण्यात येते. त्यामुळे निवड यादीमध्ये पात्र समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास उमेदवार प्रतिक्षा यादीतून भरणे आवश्यक आहे.
महावितरणच्या पदभरतीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यशासनामार्फत ऊर्जा विभागाला एकत्रित शपथपत्र दाखल करण्याबाबत सूचित केले असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देखील राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत
महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ...

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा
भोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये ...

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' अजितदादांची भाजपवर टोलेबाजी
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...

पीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...

पीव्ही सिंधू  ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ओपनमधून बाहेर
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...

NEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...

NEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...