शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (08:08 IST)

गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार

कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध देऊन व संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
अहमदनगर शहरातील तरूणीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपिंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जाकीर शाहीन शेख,त्याचा भाऊ निशाद शाहीन शेख,शहाबाज ऊर्फ शहाउद्दीन शेख (सर्व रा.सोनई ता.नेवासा) व जाकीर शेख सोबत तरूणीची ओळख करून देणारा नगरमधील ओंकार चव्हंडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी जाकीर शेख, शहाबाज शेख व ओंकार चव्हंडके यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.नगरमधील तरूणी व ओंकार चव्हंडके यांची ओळख होती. ओंकार याने त्याचा सोनई येथील मित्र जाकीर शेख व तरूणीची ओळख करून दिली. तरूणी व जाकीर हे एका कॉलेजमध्ये सोबत होते. त्यांच्यात मैत्री झाल्याने ते फोनवर बोलत असत. एक दिवस जाकीर याने तरूणीला फिरण्यासाठी जाण्याची मागणी केली.तरूणी तयार झाली.
 
ते दोघे कारमधून पारनेर तालुक्यातील एका हॉटेलवर गेले. तेथे जेवण केल्यानंतर कोल्ड्रींक्स घेतली. त्यावेळी जाकीर याने तरूणीला कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध देत लॉजवर घेऊन जात अत्याचार केला. या संबंधाचे व्हिडीओ चित्रकरण केले.सदरचे व्हिडीओ चित्रीकरण तरूणीच्या मोबाईलवर पाठविले. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. जाकीर याचा भाऊ निशाद याने तरूणीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत जाकीरसोबत लग्न करण्यास सांगितले.अत्याचार झाल्यानंतर तरूणीला गर्भधारणा झाली, यावेळी जाकीर शेख याच्या सांगण्यावरून शहाबाज शेख याने तरूणीला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.