रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (08:49 IST)

कुत्र्याला वाचविण्यासाठी तरुणांनी जीवाची बाजी लावली

पुण्यातील खडकवासला धरणालगत मोरीच्या परिसरात पंचवीस फूट खाली एक कुत्रा अडकला होता. यावेळी फिरण्यास आलेल्या तीन तरुणांनी स्वत:ची परवा न करता पाण्यातील एका खडकावर उतरून कुत्र्याला बाहेर काढले. पण, पाण्याने वेढलेल्या खडकावर ते स्वत:च अडकून पडले. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळाने त्यांना तेथून बाहेर काढले. मेहबूब विजापूरकर (वय २०), अजय मराठे (वय २०), सचिन यादव (वय २४, तिघे रा. वारजे माळवाडी) अशी या तरुणांची नावे आहेत. 
 
श्वानाला वाचविण्यासाठी हे तरुण खाली उतरले होते. रस्त्याने जात असलेल्या एका टेम्पोतील दोरी आणि काही नागरिकांच्या मदतीने त्यांनी श्वानाला सुखरूप वरपर्यंत पोहोचविले होते. मात्र, त्याच दोरीच्या आधाराने तरुणांना वर येता आले नाही. त्यामुळे ते अडकून पडले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथून अत्याधुनिक शिडी मागवून तरुणांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले.