रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (15:48 IST)

तुमची इयत्ता कंची?”, आशिष शेलार यांचा सरकारला सवाल

विद्यार्थी, पालकांना प्रचंड मानसिक तणाव देऊन, शिक्षणाचा राज्यात अभूतपूर्व घोळ घालणाऱ्या,आघाडी सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची इयत्ता कंची?”,असा संतप्त सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारला केला आहे.
 
आशिष शेलार यांनी म्हटले आहे की,“अकरावीची सीईटी रद्द करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय अनियंत्रित,अवास्तव, कठोर,भेदभाव करणारा,लहरी आणि घटनेच्या समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, अशा कठोर शब्दांत ठाकरे सरकारला फटकारले आहे.“छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची केली आहे.”

तसेच, “राज्यात बोर्ड वेगवेगळे आहेत मात्र सीईटी एसएससी बोर्डाप्रमाणे घेणे हा अन्याय आहे. लहरीपणा आहे असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.नववीच्या अंतर्गत गुणांचा विचार करुन मुल्यमापन केल्यामुळे ९५ ते १०० टक्के गुण विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. अकरावी प्रवेशावरुन पालक त्रस्त आहेत.त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल की नाही ? याबद्दल पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. याबाबत सरकारचे कुठलेही धोरण स्पष्ट नाही. शिक्षणाचा बट्ट्याबोळ करुन टाकला आहे. ज्यावेळी सीईटी घोषित केली त्यावेळी आम्ही विचारले होते, की कोणत्या अभ्यासक्रमावर घेणार? त्यावेळी सरकारने एकतर्फी निर्णय घेऊन अन्य बोर्डांचा विचार न करता एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार सीईटी घोषित केली. म्हणजे अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जो विषयच नव्हता त्याची परीक्षा कशी घेणार? पण कसलाच विचार करण्यात आलेला नाही.आता अंतर्गत गुणांचा विचार करून अकरावी प्रवेश देणार म्हणजे पुन्हा असमानता ही राहणारच..एकुण सरकारचा सगळा कारभार हा लहरी आहे हे वारंवार दिसते आहे.”,अशी टीका देखील शेलारांनी राज्य सरकार केली आहे.