1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जुलै 2015 (09:45 IST)

चंद्रभागेवर झुलता पूल

पुणे- पंढरपुरातील चंद्रभागा नदीवर सुमारे तीन कि.मी. लांबीचा झुलता पूल बांधण्याचे पंढरपूर विकास प्राधिकरणाने ठरविले असल्याची माहिती प्राधिकरणाच्या एका प्रवक्त्याने दिली. 
 
या झुलत्या पुलामुळे यात्रेच काळामध्ये गर्दीचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्तविण्यात आली आहे. आषाढी यात्रेच्यावेळी राज्यातून व बाहेरून लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. त्यामुळे भाविकांची चांगली सोय होईल, असे पंढरपूरचे उपविभागी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले. या झुलत्या पुलाचे डिझाइन तार करण्याअगोदर हृषीकेश येथील प्रसिद्ध लक्ष्मण झुला पूल येथील हाच पुलाचा आराखडा नजरेसमोर ठेवला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्राधिकरण आणखी 100 एकर जागा संपादन करणार आहे आणि त्यासाठी 400 ते 500 कोटी रुपे खर्च येईल, असे त्यांनी सांगितले आहे.