1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 22 एप्रिल 2015 (14:08 IST)

मुंबई, औरंगाबादेत मतदारांचा उत्साह

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी आज सकाळी सुरु झालेल्या मतदानास मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सकाळपासून मोठा उकाडा असला तरी मतदार केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. राज्यातील पाच नगरपालिकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. औरंगाबादेत ९०४ व नवी मुंबईत ५६८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़  औरंगाबाद महापालिकेत दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १११ जागांसाठी, तर नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया होत आहे़  दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलिस बंदबोस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदान करता येणार आहे.