गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. तीर्थ-क्षेत्र
Written By वेबदुनिया|

इंदुरचे खजराना गणपती मंदिर (पाहा व्हिडिओ)

WD
इंदुरचे खजराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे.

पंडितजींनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या दरबारात स्वप्नकथन केले. पंडितजींना स्वप्नात दिसलेल्या जागी खोदकाम करण्यात आले. खोदकामानंतर निघालेल्या गणपतीच्या मूर्तीची येथील मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर अल्पावधीतच मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ख्याती पसरली. मंगलमूर्ती मोरयाचे येथील जागृत वास्तव्य भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे. मनोकामना करून भक्तीभावाने येथे धागा बांधल्यास भक्ताची इच्छापूर्ती होते.

पाहा व्हिडिओ....