नागपंचमीची गाणी : घागर पवत बाई चुंबळ तरंगत
वहिल्या रानाला पाण्याचं जंजाळ
घागर पवत बाई चुंबळ तरंगत
नदींतल्या मगरमाशां दे माजी घागरसासू माजी वंगाळ शिव्या मला देईल नदींतल्या मगरमाशा दे माजी घागरसासरा माजा वंगाळ मला भाजुनी खाईल
नदींतल्या मगरमाशा दे माजी घागरनणंद माजी वंगाळ राग मला भरील
नदींतल्या मगरमाशा दे माजी घागरदीर माजा वंगाळ चहाड्या करील
नदींतल्या मगरमाशी दे माजी घागरपति माजा वंगाळ मला फोडुनी काडील
अग अग नदीबाई घोळ तुज्या पान्याचासारूनी ग अल्याड दे माजी घागर
अग अग नदीबाई तूं माजी माऊलीदे माजी चुंबळ ग सांजते सावली.