शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (13:30 IST)

दिव्याची अमावस्या की गटारी अमावस्या!

श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. 
कशी साजिरी करतात ही अमावस्या
या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. 
गटारी अमावस्या
दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजिरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते. 
 
पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही. 
 
हल्ली सोशल मीडियावरही याची खूप धूम असते. लोकं व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर आणि इतर सोशल साईट्सवर गटारीचे कार्टून, विनोद, शुभेच्छा शेअर करतात. 
 
काय कारण असावं?
आपल्या भारतीय ऋतुचक्राप्रमाणे श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याची सुरुवात अर्थात या दरम्यान ऋतूबद्दल होतं. ऋतूबद्दल झाल्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता अधिक असते अशात धार्मिक कारणामुळेच का नसो पण हे बंधन पाळण्यात आली असावी. तसेच श्रावण महिन्यात उपवास लावले असण्याचे एक कारण हेच असावे. या व्यतिरिक्त हा काळ मास्यांच्या प्रजननासाठी महत्त्वाचा असतो. मांसाहार असो वा शाकाहार एकूण या दरम्यान तोंडावर ताबा ठेवून भक्ती करावी. म्हणजे पोट खराब होत असून आरोग्य चांगलं राहतं.
 
आता ही अमावस्या आपल्या कशी साजिरी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. या दिवशी दिव्याचे पूजन करून जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी प्रार्थना करून कि खाऊन- पिऊन गटारीत लोळून.