सर्पदोष दूर करणारे नागचंद्रेश्वर मंदिर

nagchandreshwar mandir ujjain
Last Updated: शुक्रवार, 24 जुलै 2020 (17:12 IST)
महाकाल नगरी उज्जैनला मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात आपल्याला एक नवीन मंदिर सापडेल. परंतु, या मंदिरांपेक्षा नागचंद्रेश्वराचे मंदिर अगदी निराळे आहे. महाकालच्या शिखरावर बांधलेल्या या मंदिराचे दरवाजे वर्षातून एकदाच उघडले जातात. ते म्हणजे नागपंचमीच्या दिवशी! यामुळे नागराज तक्षकाचे दर्शन दुर्लभ मानले जाते. या दिवशी दर्शनासाठी दूरवरून आलेल्या भाविकांची गर्दी आपल्याला दिसते. एका दिवसात अंदाजे दीड लाख भाविक नागराजाचे दर्शन घेतात.
मंदिरात शिवशंभूची प्रतिमा आहे. या प्रतिमेत शिवशंकर

आपल्या संपूर्ण कुटूंबासह नाग सिंहासनावर बसलेले आहेत. भगवान विष्णूऐवजी भोलेनाथ सर्पशय्येवर विराजमान आहेत असे जगातील हे एकमेव असे मंदिर आहे. मंदिरातील मूर्तींमध्ये शंकर, गणेश आणि पार्वतीबरोबर दशमुखी सर्पशय्येवर आहेत. शिवशंभूच्या गळ्यात आणि हातात भुजंग लपेटलेला आहे. सर्पराज तक्षकाने शिवशंकराची घोर तपस्या केली होती. या तपस्येमुळे प्रसन्न होऊन भोलेनाथाने तक्षकाला अमरत्वाचे वरदान दिले. वरदानानंतर तक्षकराजाने भगवान शिवाच्या सानिध्यातच राहण्यास सुरवात केली, असे पुराणात सांगितले आहे.
हे मंदिर खूप प्राचीन असून इ.स. 1050 मध्ये राजा परमार भोज याने मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर शिंदे घराण्याचे महाराज राणोजी शिंदे यांनी 1732 मध्ये महाकाल मंदिराचा जीर्णोंद्धार केला त्यावेळी या मंदिराचा देखील जिर्णोंद्धार केला होता. या मंदिराचे दर्शन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा सर्पदोष होत नाही, असे मानले जाते. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी उघडणार्‍या या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची लांबच लांब रांग लागलेली असते. सर्वांच्या मनात एकच इच्छा असते की नागराजावर विराजमान असलेल्या शिवशंभूची एक तरी झलक पाहण्यास मिळावी.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

सकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम

सकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम
प्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...

गुरुवारी या झाडाची पूजा करावी

गुरुवारी या झाडाची पूजा करावी
आपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...

नवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...

नवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे तयार होऊ शकता
नवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...

अधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...

अधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना श्राप दिला
अधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...

पंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...

पंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते जाणून घ्या
यावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...