शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : बुधवार, 13 जुलै 2022 (17:16 IST)

Shravan 2022 कधीपासून सुरू होत आहेत श्रावण, यंदा श्रावणात किती सोमवार? कोणते सण कधी आहेत? जाणून घ्या

sawan 2022
Shravan 2022 हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तरेकडील राज्यात 15 दिवस आधी श्रावण सुरु होत असलं तरी महाराष्ट्रात अमावास्या संपल्यानंतर नवा महिना सुरु होतो. श्रावण हा महिना शिव शंकरांना समर्पित असतो. श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार या दिवशी उपवास केला जातो. यंदा 29 जुलै 2022 पासून श्रावण महिना सुरु होतो. श्रावण महिना 27 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
 
श्रावण महिन्यातील सोमवार कधी
यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार आहेत.
1 ऑगस्ट 2022: श्रावणी सोमवार (शिवामूठ: तांदूळ)
8 ऑगस्ट 2022: श्रावणी सोमवार (शिवामूठ: तीळ)
15 ऑगस्ट 2022: श्रावणी सोमवार (शिवामूठ: मूग)
22 ऑगस्ट 2022: श्रावणी सोमवार (शिवामूठ: जव)
 
इतर सण
2 ऑगस्ट 2022: नागपंचमी
11 ऑगस्ट 2022: नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
15 ऑगस्ट 2022: संकष्टी चतुर्थी
18 ऑगस्ट 2022: श्रीकृष्ण जयंती
19 ऑगस्ट 2022: गोपाळकाला
26 ऑगस्ट 2022: पोळा
26 ऑगस्ट 2022: पिठोरी अमावास्या, मातृ दिन
 
पूजा विधी - श्रावण सोमवारचं व्रत करणार्‍यांनी पहाटे लवकर स्नान करून महादेवाचे स्मरण करून संकल्प सोडावा. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. त्यानंतर शिवलिंगावर बेलची पाने, फुले, धोतरा इत्यादी अर्पण करावं. धूप, दिवा आणि उदबत्ती लावावी. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. पूजेच्या शेवटी शिव चालीसा आणि शिव आरतीचे पठण करावे.