शुक्रवार, 18 जुलै 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By वेबदुनिया|

सापांविषयी समाजातील समजुती

हिंदू धर्मानुसार शिव शंकराने नाग आपल्या गळ्याभोवती गुंडाळला आहे. तसेच विष्णूने शेषनागाचे सिंहासन करून नागाचे महत्त्व सांगितले आहे. जैन धर्मात पार्श्वनाथाला शेष नागावर बसविले आहे. श्रीकृष्णाने यमुना नदीला कालिया नागाच्या तावडीतून सोडविले होते तर शेष नागाच्या फण्यावर पृथ्वी फिरत आहे, असा पुराणात उल्लेख आला आहे. अथर्ववेदात काही नागांच्या नावांचा उल्लेख आढळतो. त्यात श्वित्र, स्वज, पृदाक, कल्माष, ग्रीव व तिरिचराजी यांचा समावेश आहे. 
 
नागमणी 
काही सापांच्या माथ्यावर मणी असतो, अशी समजूत आहे. मणी हा निळ्या रंगाचा असून अमूल्य आहे. इच्छाधारी नागाकडे हा मणी असून मणीच्या माध्यमातून अनेक चमत्कार केले जातात. भारतीय पुराणात नागासंदर्भात अनेक घटना सांगितल्या आहेत.
 
समुद्र मंथन
समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचल डोंगर महाकासवाच्या पाठीवर ठेवून वासुकी नाग मंदराचल डोंगराला गुंढाळून दिला होता. नागाच्या शेपटाकडच्या भागाकडे देव तर फण्याकडील भागात दानव होते. 
 
नागासंदर्भात भारतात अनेक समजुती आहेत. त्यापुढील. 
1. जंगलात इच्छाधारी नाग असतात, ते आपल्या इच्छेनुसार रूप बदलू शकतात. 
2. नाग-नागीण बदला घेतात.
3. काही इच्छाधारी नागाच्या माथ्यावर मणी असतो. 
4. नागांच्या स्मरण केले तर शक्ती प्राप्त होते.
5. शंभर वर्ष पूर्ण केल्यानंतर नागाला उडता येते व त्यांना दाढी- मिशी फुटते. 
6. नाग कोणाच्याही शरीरात प्रवेश करू शकतो. 
7. नागलोक असते तेथे नागमानव राहत असतात. 
8. नागाच्या अनेक प्रजाती असतात. त्यातील अजगर साप अतिशय मोठा असतो. तो दूरूनच आपल्या शत्रूला ओढत असतो. 
9. नाग स्वतः: बिळ तयार करत नसून ते उंदराच्या बिळात राहतात. 
10. नाग जमिनीत असलेल्या धनाचे संरक्षण करत असतात. 
11. नागांकडे मानवाला संमोहित करण्याची शक्ती असते.
12. नागाला मारणे किंवा त्यांचा प्रणय पाहणे पाप मानले जाते. 
13. नाग शिव शंकराचा अवतार मानला जातो.
 
नागाचे विष-
जगभरात सापाच्या एकूण 2500 जाती आहेत. त्यातील 150 जातीचे साप विषारी असतात. भारतात 216 जातीचे साप आढळत असून त्यातील केवळ 53 जातीचे साप विषारी आहेत. त्यात चार जातीचे साप अत्यंत विषारी असतात. त्यात नाग (कोब्रा) व घोणस या सापांचा समावेश आहे.