शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. सिंहासन बत्तिशी
Written By वेबदुनिया|

सिंहासन बत्तिशीची कथा क्र.12 (मोहिनी)

WD
एके रात्री राजा विक्रमादित्य महलाच्या छतावर बसला होता. त्याला एका दीन स्त्रीची किंचाळी ऐकू आली. ती संकटात असल्याचे पाहून राजा विक्रमाने तिला वाचवण्याचे ठरविले व ढाल-तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन आवाजाच्या दिशेने निघाला.

जंगलाच्या मध्यभागी एक स्त्री ''वाचवा वाचवा'' म्हणत सैरावैरा पळत होती. एक दानव तिचा पाठलाग करत होता.

राजा विक्रमाने कोणताच विचार न करता दानवाशी युध्द करण्यासाठी घोड्‍या खाली उतरला. दानव फार शूर व भयानक होता. राजा विक्रम त्याच्याबरोबर चतुराईने युध्द करीत होता. राजा विक्रमाने क्षणात राक्षसाचे धड मानेपासून वेगळे केले. मात्र राक्षस मरण पावला नाही. त्याची मान पुन्हा त्याच्या शरीराला चिकटली व तो जिंवत झाला. एवढेच नाही तर जेथे त्याचे रक्त पडले होते तेथे राक्षस उत्पन्न होत होते. हे पाहून राजा विक्रमादित्य चकित झाला. तरी राजा विक्रम घाबरला नाही. तो दोन्ही राक्षसांचा सामना करत होता. युध्दात राजाने राक्षसांचा पराभव केला.

नंतर राजाने पीडित स्त्रीची विचारपूस केली. ती सिंहुल द्वीप येथील एका ब्राह्मणाची मुलगी आहे. एके दिवशी ती तळ्यात स्नान करत असताना तिला राक्षसाने पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला. तेव्हापासून तो तिला जंगलात घेऊन आला आहे. राजा विक्रम तिला महालात घेऊन गेला.

राजा विक्रमने तिची राक्षसाच्या तावडीतून सुटका करण्‍याचे ठरविले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, राक्षसाच्या पोटात एक मोहिनी आहे. राक्षस मरताच ती राक्षसाच्या तोंडात अमृत टाकते व तो जिंवत होऊन जातो.

राजा विक्रम निश्चय करतो की, राक्षसाला मारूनच महालात परतेल. राजा जंगलात विश्रांती घेत असताना एक सिंहाने राजावर हल्ला केला. राजाने सिंहाला जखमी केले व तो जंगलात पळून गेला. पुन्हा दुसर्‍या सिंहाने राजावर हल्ला केला. राजाने त्याला दूर हवेत फेकून दिले. सिंहाने राक्षसाचे रूप धारण केले. सिंहरूपात आलेला तो राक्षसच होता, हे राजाने ओळखले. नंतर राजा व राक्षसमध्ये भिषण युध्द झाले. राक्षस दमला तेव्हा राजाने राक्षसाच्या पोटात तलवार घातली. राक्षण जमीनीवर कोसळला. नंतर राजाने त्याचे पोटा फाडून टाकले.

पोटातून मोहिनी बाहेर निघाली व अमृत घेण्यासाठी पळू लागली तेवढ्यात राजाने दोन वेताळांचे स्मरण करून तिला पकडण्याचा आदेश दिला. अमृत न मिळाल्याने राक्षण मरण पावला. मोहिनी ही शिवाची गणिका होती. राक्षसाची सेवा करण्याची ती शिक्षा भोगत होती. महालात पोहचल्यानंतर राजा विक्रमने ब्राह्मण कन्येला तिच्या आई-वडिलांकडे सोपविले व मोहिनीबरोबर स्वत: विवाह केला.