शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. सिंहासन बत्तिशी
Written By वेबदुनिया|

सिंहासन बत्तिशीची कथा क्र.16 (पाताल नगरी)

WD
राजा विक्रमादित्य उज्जैन नगरीत राज्य करीत होता. उज्जैन नगरीची किर्ती सार्‍या देशात पसरली होती. एकदा त्याच्या दरबारातातील विद्वानांमध्ये पाताल लोकातील शेषनागच्या ऐश्वर्यावर चर्चा सुरू होती. प्रत्येक जण त्याच्या ऐश्वर्याची वाह! वाह! करत होता. भगवान विष्णुचा सेवक असलेल्या शेषनागाच्या पाताल नगरी ही सुखसोयींनी युक्त होती.

विक्रमादित्य राजाने सशरीर पाताल लोक जाण्याचे ठरविले. त्याने प्रदत्त वेताळांचे स्मरण करताच राजाच्या सेवेस उपस्थित झाले. ते राजाला पाताल लोकात घेऊन आले. राजाने जे काही ऐकले होते, तेथे तो प्रत्यक्षात पहात होता. राजा विक्रमने शेषनाग यांची भेट घेतली. राजाला सशरीर आल्याचे पाहून शेषनाग त्याच्यावर खूष झाला. राजाला शेषनागाने चार चमत्कारी रत्न भेट दिले. पहिले रत्न त्याला वस्र व आभूषणे देऊ शकते. दुसरे रत्नद्वारा राजा पाहिजे तितके धन प्राप्त करू शकतो. तिसर्‍या रत्नच्या माध्यमातून धर्म-कार्य तसेच यश प्राप्त करू शकतो. तर चौथा रत्नद्वारा रथ, अश्व तसेच पालखी राजा प्राप्त करू शकतो.

राजा देवीच्या प्रदत्त वेताळांच्या मदतीने ते चार रत्न घेऊन आपल्या नगरीत दाखल झाला.

राजाला वाटेत एक ब्राह्मण भेटला. त्याने राजाला पाताल लोकातील समाचार विचारला. राजाने सारी हकिकत ब्राह्मणाला सांग‍ित‍ली. राजाने आपल्या इच्छेने ब्राह्मणाला एक रत्न भेट ‍म्हणून देऊ केला. परंतू ब्राह्मणाने ते घेण्यास नकार दिला व सांगितले आधी आपल्या पत्नी‍शी चर्चा केल्यानंतरच रत्न स्वीकारेल.

ब्राह्मणाने त्या संदर्भात आपली पत्नी व मुलांशी चर्चा केली. मात्र त्यांनी इतर तीन रत्नांसाठी ही इच्छा व्यक्त केली. ब्राह्मण द्विधा मनस्थतीत अडकून पडला. दुसर्‍या दिवशी ब्राह्मण जेव्हा राजाकडे पोहचला तेव्हा राजाने ब्राह्मणाच्या मनातील गोष्ट जाणली व त्याला चारही चमत्कारी रत्ने भेट देऊन टाकले. ब्राह्मणाने राजाचे आभार मानले व घरी निघून गेला.