शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (11:17 IST)

Lemon Rice उरलेल्या भाताने मिनिटात तयार करा लेमन राइस

लोकांना अनेकदा रात्री भात खाणे आवडते. पण भात उरल्यावर सकाळी त्याने नाश्ता तयार करता येतो. रात्रीचा भात वाया न घालवता तुम्ही त्यापासून लेमन राइस बनवू शकता. ही एक दक्षिण भारतीय डिश आहे जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आवडेल. ती बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया ...
 
साहित्य-
तांदूळ - 1 कप
भाजलेले शेंगदाणे - 2 टेस्पून
लिंबाचा रस - 1 टीस्पून
मोहरी - 1 टीस्पून
हिरवी मिरची - 1 टीस्पून (बारीक चिरलेली)
हळद पावडर - 1 टीस्पून
कढीपत्ता - 4-5
चवीनुसार मीठ
तेल - आवश्यकतेनुसार
 
कृती
. कढईत तेल गरम करून मोहरी घाला.
. आता तांदूळ वगळता बाकीचे साहित्य घालून ते परतून घ्या.
. तयार मसाल्यात लिंबाचा रस आणि तांदूळ घालून 1-2 मिनिटे शिजवा.
. तुमचा लेमन राइस तयार आहे.
. सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घ्या आणि टोमॅटो सॉस किंवा लोणचे यासह सर्व्ह करा.