1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

वीजेंदर 81 किलो गटात खेळणार!

WD
लंडन ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करणारा वीजेंदर म्हणाला, की यंदा मुष्टियुद्धाच्या फारशा स्पर्धा नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्षी होणार्‍या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत आपण 81 किलो वजन गटात सहभागी होणार आहेत.

वीजेंदरने सध्याच्या त्याच्या 75 किलो वजन गटातही चां्लेच यश मिळविले असून, त्याने याच गटाच भारताचे प्रतिनिधित्व करताना बीजिंक ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते.

त्याने 2009मद्ये जागतिक स्पर्धेत याच गटात पदक पटकावल्यानंतर क्रमवारीत अव्वल स्थानी झेपही घेतली होती. दरम्यान, वीजेंदरने सलग पाचव्यांदा राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधून माघार गघेसतली आहे, परंतु येत्या 30 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे खेळत्या जाणार्‍या या स्पर्धेला मात्र उपस्थित राहणार आहे.

त्याबाबत वीजेंदर म्हणाला, की राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नसलो तरी, या स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यात आपण उपस्थित राहणार आहोत, तसेच काही सामन्यांनाही हजेरी लावणार आहोत.