जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी'

vijay choudhari
नागपूर| Last Modified सोमवार, 11 जानेवारी 2016 (16:27 IST)
जळगावच्या विजय चौधरी याने मुंबईच्या विक्रांत जाधवचा ६-३ ने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' ची गदा पटकावली आहे. चुरशीच्या अंतीम सामन्यात केवळ १५ सेकंद बाकी असताना जळगावच्या विजयने मुंबईच्या विक्रांतला चितपट केले. विजय चौधरीला रोख २९ हजार रुपये आणी मानचिन्ह(गदा) देऊन गौरवण्यात आले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१६ च्या विजेत्यास थेट पोलीस दलात घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे विजय चौधरी हा आता महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत होणार हे नक्की झाले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली होती. अहमदनगरचा केवल भिंगारे यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
नागपूरमध्ये सुरु असलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी'चा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला. मॅट विभागातून मुंबईच्या विक्रांत जाधवने अंतिम फेरीत पुण्याच्या महेश मोहोळचा पराभव करत महाराष्ट्र केसरीच्या अंतीम सामन्यात प्रवेस केला होता. तर दुसरीकडे माती विभागातून जळगावच्या विजय चौधरीने सोलापूरच्या बाला रफिक शेखवर मात करत महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी दंड थोपटले होते.

पराभूत मल्लाला प्रेक्षकांनी डिवचल्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले. या हाणामारीत काही मल्लांसह त्यांचे समर्थक किरकोळ जखमी झाले. दंगलखोर प्रेक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चिटणीस पार्कवर शनिवारी सायंकाळी पुणे शहरचा महेश मोहोळ आणि पुणे जिल्ह्याचा राहुल खणेकर या मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरी गादी गटातील चुरशीची लढत झाली होती. येवढी घटना सोडता ही स्पर्धा अतीशय चांगल्या पद्धतीने पार पडली असल्याची माहीती समोर आली आहे.यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...