1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By WD|
Last Modified: मुंबई , बुधवार, 5 मार्च 2014 (10:04 IST)

टेनिसस्टार राफेल नदाल मुंबईकडून खेळणार

टेनिसस्टार राफेल नदाल आणि माजी वर्ल्ड नंबर वन पीट सॅम्प्रस आता मुंबईकडून खेळताना दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगसाठी नदाल आणि सॅम्प्रसला मुंबई संघासोबत करार केला आहे.
 
मुंबई संघात नदाल,सॅम्प्राससह रोहन बोपन्ना,सानिया मिर्झा या खेळाडूंचा सहभाग आहे.तर गेल मोनफिल्स,अॅना इव्हानोविच आणि फॅब्रिस सँतोरो या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही मुंबईच्या संघाशी करार केला आहे.
 
या स्पर्धेसाठी नुकताच दुबईत खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. सर्बियाचा नोवाक जोकोव्हिचला दुबईच्या संघाने, ब्रिटनच्या अँडी मरेला बँकॉकच्या संघानं करारबद्ध केले आहे. तर सिंगापूरच्या संघात आंद्रे आगासी, सेरेना विल्यम्सची निवड झाली आहे.
 
भारताचा टेनिसस्टार महेश भूपतीच्या पुढाकारानं होत असलेली ही स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.