फीफा विश्वचषक 2014 : पहिला सामना हा महत्त्वाचा

fifa dani alves
ब्रासोलिया| wd| Last Updated: बुधवार, 11 जून 2014 (15:07 IST)
ब्राझीलमध्ये खेळल्या जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उद्घाटनाचा म्हणजेच पहिला सामना हा अंतिम सामन्या इतकाच महत्त्वाचा राहील, असे राईट-बॅक खेळाडू डानी अल्वेस याने सांगितले.

12 जून रोजी यजमान ब्राझील आणि क्रोएशिातील लढतीने या स्पर्धेस सुरुवात होणार आहे. या सामन्याबाबत तो बोलत होता. ब्राझीलने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात सर्बियाविरुद्ध 1-0 असा विजय मिळविला. यावेळी घरच्या मैदानावरील प्रेक्षकांनी हुर्रे उडविला आणि ब्राझील संघाच्या क्षमतेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. परंतु या शंका अल्वेसने त्वरित फेटाळून लावल्या आहेत.


गुरुवारी, जेव्हा स्पर्धा होईल तेव्हा यजमान राष्ट्राचे खेळाडू हे त्यांच्या सर्वोत्तम खेळ करतील. खरेपणाचा क्षण आता सुरू होत आहे, असे त्याने पत्रकारांना सांगितले. सुरुवातीचा सामना हा केवळ तीन गुण मिळविणकरिताच नाही तर तो या स्पर्धेत खेळणार्‍या प्रतिस्पर्धी संघांना संदेश देणारा ठरेल, असे तो म्हणाला. इतर संघांना इशारा देणसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, असे मला वाटते आणि तो अंतिम सामन्यासारखा राहील, अशी भरही त्याने घातली.

ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाचे सावोपावलो प्रेक्षकांशी दीर्घकाळाचे संबंध आहेत व त्यासंबंधाची यावेळी चाचणी ठरणार आहे. सर्बियाविरुद्धच्या सामन्यात खेळाडू संघर्ष करीत होते. परंतु यावेळी मात्र वेगळे राहील. आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळत आहोत आणि प्रेक्षक हे निश्चितपणे आमच्या बाजूने उभे राहतील आणि ब्राझीलचा संघ विजेतेपदाचा स्पर्धक राहील, असेही अल्वेस म्हणाला. रिओ दि जानेरोच्या उत्तरेकडे असलेल्या मैदानावर ब्राझील संघाचे प्रशिक्षण झाले. सावोपावलो येथे संघ परतल्यानंतर सुमारे हजार दर्शकांनी या संघाचे स्वागत केले. दोन आठवडय़ापूर्वी वेगळी स्थिती होती, असेही त्याने स्पष्ट केले.

प्रेक्षकांना पाहणे हे आमच्यासाठी एक प्रकारची देणगीच आहे. विश्वचषक ब्राझीलला आहे आणि त्याचे आश्चर्यकारक क्षण पाहावास मिळणार आहेत. हे ब्राझीलच्या जनतेला समजून येईल आणि ही स्पर्धा यशस्वी होईल, असे शेवटी तो म्हणाला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...