बेकहॅमने घेतला 400 कोटींचा बंगला

devid
वेबदुनिया|
WD
फुटबॉलच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणणारा डेव्हिड बेकहॅम हा इंग्लंडचा सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून ओळखला जातो. फुटबॉलच मैदानावरील निवृत्तीनंतर आपले आयुष्य आरामात जगता यावे यासाठी बेकहॅमने पश्चिम लंडन येथे एक चार मजली बंगला तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून विकत घेतला. या नवीन घराच्या डागडुजी व रंगरंगोटीसाठी बेकहॅमने 50 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या घराचे वैशिष्टय़ म्हणजे या घरामध्ये बेकहॅम व त्याची पॉप स्टार पत्नी व्हिक्टोरिया यांच्यासाठी विशेष सलून व स्पा असणार आहे. तसेच पत्नी व्हिक्टोरियाच्या बुटांसाठी एक वेगळी खोली असेल. या आलिशान बंगल्यात बेकहॅमने बसवलेल्या साउंड सिस्टीममुळे सर्व खोलंमध्ये गाणी ऐकू जाणार आहेत. या साउंड सिस्टीमवर संगणक किंवा मोबाइल फोनच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच प्रत्येक बाथरुममध्ये वॉटरप्रूफ प्लाझ्मा टीव्हीही लावणचा बेकहॅम व त्याची पत्नी विचार करत आहे.

या नवीन घराच तळमजल्यावर अभ्यासाठी खास खोली, जिम, मसाज रुम, तीन सर्व्हिस रुम आणि एक सुंदर गार्डन असणार आहे. तर बंगल्याच्या तळघरामध्ये गॅरेज आहे. तसेच बेकहॅमच्या चार मुलांसाठी दुसर्‍या मजल्यावर खास खोल्या बनवण्यात आल्या आहेत. बेकहॅम व व्हिक्टोरियाने त्यांच्या ‘बॅकिंगहॅम पॅलेस’ म्हणून ओळखला जाणारा ‘हार्डफोर्डशावर होम’ हा बंगला नुकताच 1200 कोटी रुपयांना विकला आहे. तसेच बेकहॅमचे कॅलिफोर्निया, दुबई आणि दक्षिण फ्रान्समध्ये बंगले आहेत. निवृत्तीनंतर ब्रिटनमध्ये स्थायिक होऊन आपल्या मुलांचे शिक्षण ब्रिटनमध्येच व्हावे अशी बेकहॅम पति-पत्नीची इच्छा आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली
सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली आहे. आता सर्रास शहरातील झाडांना लटकलेली दिसू ...

राज ठाकरे यांचा फोन आला, खुद्द शरद पवार यांनीच दिली माहिती

राज ठाकरे यांचा फोन आला, खुद्द शरद पवार यांनीच दिली माहिती
वाढीव वीज बिलाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली ...

4 जी मोबाइल फोन खरेदीसाठी कर्ज देऊन Airtelने खास ऑफर आणली

4 जी मोबाइल फोन खरेदीसाठी कर्ज देऊन Airtelने खास ऑफर आणली
भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना 4 जी मोबाइल हँडसेट खरेदी ...

US Election 2020: झुकरबर्गला चिंता, निकाल विलंब झाल्यास ...

US Election 2020: झुकरबर्गला चिंता, निकाल विलंब झाल्यास अमेरिकेत अशांतता निर्माण होईल
सॅन फ्रान्सिस्को. अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अजून काही दिवस शिल्लक आहेत, ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मुंबई, पुणे आणि ठाणे तयार आहे ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मुंबई, पुणे आणि ठाणे तयार आहे का?
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुणे या महानगरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट ...