1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By नई दुनिया|
Last Modified: बॅंकॉक , मंगळवार, 3 नोव्हेंबर 2009 (18:15 IST)

भारत, चीन सामना बरोबरीत

भारतीय महिला संघाची आशिया करंडक हॉकी स्पर्धेत चीनला आज (मंगळवारी) बरोबरीत रोखले. यामुळे उपात्यंफेरी गाठण्याचा भारतीय संघाचा आशा उंचविल्या आहेत. आता भारताला मलेशियाविरुद्ध बुधवारी होणारा सामना बरोबरीत सोडवावा लागणार आहे.

सामन्यात चीनने 18 व्या मिनटात गोल करुन आघाडी घेतली. परंतु 45 व्या मिनटाला शोभा अंजूम हिने गोल करुन बरोबरीत आणून ठेवले. शेवटपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले. भारतीय संघाने या स्पर्धेत उत्साहवर्धक कामगिरी केली आहे. भारताने सिंगापूरचा 13-0 ने, तर थायलंडचा 15-0 ने धुव्वा उडविला होता. सराव सामन्यात भारताने गतविजेत्या जपानलाही पराभवाचा धक्का दिला होता.