राष्ट्रकुल घोटाळ्याची सीव्हीसी चौकशी

नवी दिल्ली| वेबदुनिया|
2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या 3500 कोटी रुपयांच्या 30 कामांची केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) चौकशी करणार आहे. केंद्र व राज्य सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभाग, दिल्ली महानगरपालिका, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीने स्पर्धेआधी विविध विकास कामे केली होती.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 3 ते 14 ऑक्टोबर 2010 दरम्यान येथे पार पडल्या होत्या. स्पर्धेआधी करण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निवृत्त नियंत्रक व महालेखापाल व्ही.के. शुंगलू यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या सहा अहवालांत विविध कामांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली होती. तसेच इतर 26 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. ही सर्व कामे साधारण 3316 कोटी रुपयांची होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबंधित कामांच्या चौकशीचे निर्देश राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला दिले आहेत.
दक्षता आयोगाने अधिक चौकशीसाठी काही प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित केली आहेत. चौकशी विविध टप्प्यांवर असून भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत विविध विभागांना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. अनेक विभाग उत्तर देण्यासाठी विलंब करत आहेत.

सरकारच्या 37 खात्यांमार्फत 9000 प्रकल्पांमध्ये जवळपास 13000 कोटींचा खर्च झाला आहे. सीव्हीसीने स्पध्रेतील 70 भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी केली आहे. त्यातील 20 प्रकरणांची चौकशी बंद केल्याची माहिती सू़त्रांनी दिली.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...