शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By नई दुनिया|

सायनाचे मिशन 'जपान ओपन'

जपान ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी आपण आतुर झालो असून, या स्पर्धेत आपण विजयी होवू असा विश्वास भारतीय बॅडमेंटन खेळाडू सायना नेहवालने व्यक्त केला आहे.

जपान ओपनसाठी आपण भरपूर तयारी केली असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. चीन मास्टर्स स्पर्धेत सहभागी न होता आल्याची खंत व्यक्त करतानाच याचा आपल्या खेळावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे तिने म्हटले आहे.

या वर्षा अखेरपर्यंत आपल्या रँकिंगमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे तिने म्हटले आहे.