1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2023 (07:55 IST)

राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी !

dodgeball
कुडाळ : वाशीम (कारंजा लाड)येथे तालुका क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत येथील कुडाळ हायस्कूलच्या संघाने सिंधुदूर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेतून निवडक खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कुडाळ हायस्कूल जुनिअर कॉलेजच्या पियुष प्रीतम कदम व उमाजी दिलीपकुमार कदम या दोन खेळाडूंची महाराष्ट्र राज्य डॉजबॉल या संघात निवड करण्यात आली,तर राज्यस्तरीय पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव विजय मयेकर व संघ व्यवस्थापक सिद्धार्थ बावकर यांची निवड करण्यात आली.या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत सिंधुदूर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कुडाळ हायस्कूल च्या संघाने केले. या संघात यश प्रभू (संघनायक), पियुष कदम, चिन्मय लंगवे, विश्वजीत परीट*
अथर्व पाटकर ,उमाजी कदम,ओंकार गावडे , गौरव राऊळ, प्रणय वेजरे ,व यश कांबळी या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या संघाने खेळाचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
 
संघाचे व्यवस्थापक म्हणून सिद्धार्थ प्रकाश बावकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ) यांनी उत्तम सहकार्य करून स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.येथील कुडाळ हायस्कूलच्या या संघातील पियूष कदम व उमाजी कदम या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या महाराष्ट्र राज्य डॉजबॉल या संघात निवड करण्यात आली. सदर यश संपादन केल्याबद्दल कमशिप्र मंडळाचे पदाधिकारी का. आ. सामंत , सुरेश चव्हाण तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.तसेच पियूष व उमाजी याना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षेत विजय मयेकर व सिद्धार्थ बावकर यांनी यश संपादन केले. यांचेही संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.दरम्यान ,सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनचे सचिव श्री. मयेकर व उपाध्यक्ष अनिल आचरेकर यांनी सर्व खेळाडूंचे व पालक तसेच व्यवस्थापक श्री बावकर यांचे अभिनंदन केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor