रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (11:06 IST)

FIH Women's Junior World Cup:भारताचा जर्मनी-मलेशिया आणि वेल्सच्या गटात समावेश,सलीमा करणार संघाचे नेतृत्व

मिडफिल्डर सलीमा टेटेची गुरुवारी दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रम येथे 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या FIH महिला ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 20 सदस्यीय संघाचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील कोविड-19 संसर्गाच्या ओमिक्रॉन स्वरूपाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुढे ढकलण्यात आली होती. बचावपटू इशिका चौधरी या स्पर्धेत भारताची उपकर्णधार असेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाचा भाग असलेल्या मिडफिल्डर शर्मिला देवी आणि लालरेमसियामी यांनाही संघात स्थान मिळाले आहे.
 
बिचू देवी खरीबम आणि खुशबू यांचा गोलरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. बिचू देवीने अलीकडेच जर्मनीविरुद्धच्या एफआयएच प्रो लीग सामन्यात वरिष्ठ भारतीय संघासाठी पदार्पण केले. मरिना लालरामघाकी, प्रीती, प्रियांका, इशिका चौधरी आणि अक्षता आबासो देखळे यांना संरक्षण फळीत स्थान मिळाले आहे. मिडफिल्डमध्ये टेटे, शर्मिला आणि लालरेमसियामी यांच्याशिवाय रीट, अजमिना कुजूर, बलजीत कौर आणि वैष्णवी विठ्ठल फाळके यांचा समावेश आहे. पुढच्या रांगेत लालरिंदिकी, जीवन किशोरी टोप्पो, मुमताज खान, ब्युटी डुंगडुंग, दीपिका आणि संगीता कुमारी यांचा समावेश आहे.
 
संघ खालीलप्रमाणे -
गोलरक्षक: बिचू देवी खरीबम आणि खुशबू,
डिफेंडर: मरिना लालरामघाकी, प्रीती, प्रियांका, इशिका चौधरी आणि अक्षता आबासो देखळे.
मिडफिल्डर: सलीमा टेटे (कर्णधार), शर्मिला देवी लालरेमसियामी, रीत, अजमिना कुजूर, बलजीत कौर आणि वैष्णवी विठ्ठल फाळके.
फॉरवर्ड्स: लालरिंदिकी, जीवन किशोरी टोप्पो, मुमताज खान, ब्यूटी डुंगडुंग, दीपिका आणि संगीता कुमारी.
स्टँडबाय: माधुरी किंडो, नीलम, मंजू चौरसिया, रुतुजा दादासो पिसाळ आणि अन्नू.