मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (14:58 IST)

लक्ष्य सेनने पदक निश्चित केले, उपांत्य फेरी गाठली

जागतिक चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदकाच्या जवळ गेला आहे. त्यांनी  पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्यला उपांत्यपूर्व फेरीत वॉकओव्हर मिळाला.
शुक्रवारी (18 मार्च) होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून चीनच्या लू गुआंग जूने माघार घेतली. लक्ष्यने उपांत्य फेरी गाठून कांस्यपदक निश्चित केले आहे.
 
सेमीफायनलमध्ये लक्ष्यचा सामना मलेशियाच्या ली जी जिया किंवा जपानच्या केंटो मोमोटाशी होईल. दुसरीकडे, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पाचव्या मानांकित भारतीय जोडीला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही. दोघांनाही इंडोनेशियाच्या मार्कस फर्नाल्डी गिडोन आणि केविन संजय सुकामुल्जो यांनी 47 मिनिटांत 24-22, 21-17 असे पराभूत केले.
 
याआधी गुरुवारी 20 वर्षीय लक्ष्य सेनने दुस-या फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकाच्या अँन्डर्स अँटोनसेनचा 21-16, 21-18असा पराभव केला. लक्ष्यने गेल्या आठवड्यात जर्मन ओपनच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. भारतीय शटलरने सुरुवातीपासूनच अँडर्स अँटोनसेनविरुद्ध आपले मैदान पकडले. त्यांनी पहिला गेम 21-16  असा सहज जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यचे आव्हान होते, पण त्याने त्यावरही मात केली. दुसरा गेम 21-18 असा जिंकून सरळ गेममध्ये विजय मिळवला.