शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (16:38 IST)

I League: भारतीय फुटबॉलमध्ये कोरोनाचा स्फोट, एआयएफएफने स्पर्धा 6 आठवडे पुढे ढकलली

बायो बबलमधील संघांमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) सोमवारी आय-लीग किमान सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलली. नवीन चाचणीनंतर, कोविड -19 पॉझिटिव्ह प्रकरणांची एकूण संख्या 45 वर गेली आहे, ज्यामुळे AIFF ने सहा आठवड्यांसाठी आय-लीग निलंबित केली आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, "आय-लीग किमान सहा आठवड्यांसाठी निलंबित केली जाईल."    
आय-लीगचे अधिकारी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेतील आणि भविष्यातील कृतीचा निर्णय घेतील. गेल्या बुधवारी, बायो बबलमध्ये कोविड-19 प्रकरणे आल्यामुळे आय-लीग आठवडाभरासाठी स्थगित करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात आठ खेळाडू आणि तीन अधिकारी प्राणघातक विषाणूने  पॉझिटिव्ह आढळले. 
 यंदा आय-लीग तीन ठिकाणी आयोजित करण्यात आली असून 13 संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करत आहेत.