गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2023 (10:34 IST)

Junior Mens Asia Cup Hockey: पाकिस्तानचा पराभव करून भारताने चौथ्यांदा विजेतेपद पटकावले

hockey
भारतीय ज्युनियर हॉकी संघाने आपला दबदबा कायम ठेवत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत चौथ्यांदा आशिया चषक विजेतेपद पटकावले. अंगद बीर सिंगने 13व्या मिनिटाला, अरिजित सिंगने 20व्या मिनिटाला गोल केला. अब्दुल बशारतने 37व्या मिनिटाला पाकिस्तानसाठी एकमेव गोल केला. या स्पर्धेत अपराजित कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने मलेशियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या (FIH) पुरुष ज्युनियर विश्वचषकासाठीही पात्रता मिळवली आहे.पाकिस्तानने तीन वेळा (1987, 1992 आणि 1996) ही स्पर्धा जिंकली आहे.
 
अंगदबीर ने अरिजितच्या शॉट वरून चेंडू घेत पहिला गोल केला. अरिजितने 2-0 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर पाकिस्तानला गोल करण्यात यश मिळाले. अंतिम क्वार्टरमध्ये पाकिस्तानने बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण भारताचा बचाव खंबीर राहिला. भारतीय कर्णधार उत्तम सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
 
 
Edited by - Priya Dixit