शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मे 2017 (11:47 IST)

प्रो-कबड्डी लीग : पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेशबंदी

इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या पावलांवर पाऊल टाकत प्रो-कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामात फ्रेंचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेशबंदी केली आहे. सोमवारी झालेल्या परदेशी खेळाडूंच्या लिलावामध्ये नासिर अली, वासिम सज्जड, हसन रझा यांच्यासह ब आणि क विभागातील सर्वच खेळाडूंना संघमालकांनी प्रकर्षांने टाळले आहे.

प्रो-कबड्डीच्या पहिल्या लिलावात पाकिस्तानी खेळाडूंची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिसऱ्या हंगामात निवड झालेले पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊच शकले नव्हते. चौथ्या हंगामातही त्यांचा सहभाग नव्हता. पाकिस्तानकडून दहशतवादाला पाठबळ देण्याचे कार्य थांबणार नाही, तोवर त्यांच्याशी क्रीडासंबंध प्रस्थापित होणे कठीण आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना प्रो-कबड्डीमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.