1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (19:42 IST)

महिला फुटबॉलपटूंसाठी महत्त्वाचा बदल,14 आठवड्यांची प्रसूती रजा नियमित पगारासह मिळेल

इंग्लंडच्या महिला फुटबॉल खेळाडूंसाठी प्रसूती रजा धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यानंतर खेळाडूंना पुढील हंगामापासून नियमित वेतन आणि अतिरिक्त भत्त्यांसह 14 आठवड्यांची सुट्टी मिळेल. 

इंग्लंड फुटबॉल असोसिएशनने सांगितले की, महिला सुपर लीग आणि महिला चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना या सुविधा मिळणार आहेत. यापूर्वी त्यांना किती रजा द्यायची हे क्लबवर अवलंबून होते आणि खेळाडूने क्लबसोबत किमान 26 आठवडे खेळणेही बंधनकारक होते. मात्र आता नव्या धोरणानुसार अशी कोणतीही सक्ती नाही. एवढेच नाही तर, कराराअंतर्गत दुखापत आणि आजारपणाचे कव्हरेजही जास्त असेल.
 
चेल्सीची व्यवस्थापक एम्मा हेस म्हणाली: “हे योग्य दिशेने आणखी एक पाऊल आहे. तो केवळ इंग्लंडमध्येच नाही तर जगभर लागू झाला पाहिजे.