शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (10:54 IST)

Tokyo Olympics : बजरंग पुनिया इराणच्या पैलवानाला पराभूत करून उपांत्य फेरीत पोहोचला

टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्ती मॅटवर भारताचा सर्वात दबंग कुस्तीपटू बजरंग पुनियाने  उपउपांत्यपूर्व फेरीत इराणच्या पैलवान अर्नाझारला बाद केले. दोघांमध्ये भीषण दंगल झाली. सामना 3-3 च्या बरोबरीत संपला पण बजरंगला सर्वोच्च पॉइंट केल्यामुळे सामन्याचा विजेता घोषित करण्यात आले.
 
बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पोहोचला
पहिल्या फेरीत इराणी कुस्तीपटूने एक गुण घेत बजरंगवर 1-0 अशी आघाडी घेतली. त्याचबरोबर बजरंगने दुसऱ्या फेरीत दोन गुण मिळवून 2-1 अशी आघाडी घेत शानदार पुनरागमन केले आणि सामना जिंकला.यासह त्याने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याचा सामना अझरबैजानच्या अलीयेव हाजीशी होईल.
 
बजरंग पुनियाने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली बजरंग पुनियाने किर्गिस्तान कुस्तीपटू अर्नाझार अकमातालिव चा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बजरंग लवकर आघाडीच्या आधारावर जिंकला.आता त्याचा सामना पैलवान गियासी चेका मोर्तझाशी होईल. बजरंग पुनियाने पहिल्या फेरीत शानदार सुरुवात केली. त्याने 1-0 अशी आघाडी घेतली. मग किर्गिस्तानच्या पैलवानाने एक गुण मिळवला आणि गुण 1-1 ने बरोबरीत आणला. त्यानंतर पुनियाने दोन गुण घेत किर्गिस्तानच्या कुस्तीपटूवर 3-1 अशी आघाडी घेतली. त्याच वेळी, दुसऱ्या फेरीत किरिगिस्तानच्या कुस्तीपटू अर्नाझार अकमतालीव ने एका पाठोपाठ एक गुण मिळवून गुण 3-3 अशी बरोबरीत आणले. पण बजरंगने सुरुवातीच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला.