शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By राकेश रासकर|
Last Modified: पॅरिस , मंगळवार, 5 जून 2007 (09:18 IST)

हेविटला हरवून नदाल उपांत्यपूर्व फेरित

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा सलग तिसर्‍यांदा जिंकण्याच्या मनसुब्याने आलेल्या स्पेनच्या राफेल नदालने आज माजी अव्वल खेळाडू लेटन हेविटचा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरित प्रवेश केला. तर दुसरीकडे सर्बियाच्या नोवाक जोकोविच रशियाच्या इगोर एंद्रीव व स्पेनच्या कार्लोस मोया यांनीही अंतिम आठमध्ये स्थान मिळवले.

जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या नदालने ऑस्ट्रेलियाच्या हेविटचा 6-3, 6-1, 7-6 असा सरळ सेटमध्ये पराभव विजेतेपदाकडे आपली वाटचाल चालू ठेवली. विशेष म्हणेज त्याचा आजा 21 व्वा वाढदिवस होता.

गेल्यावर्षीसुध्दा नदालने हेविटचा चोथ्याफेरित पराभव केला होता. पहिले दोन्ही सेट सहज जिंकल्यावर नदाल सहज जिंकेल असे वाटत होते मात्र हेविटने तिसर्‍या सेटमध्ये कडवी झूंज दिली. पण निर्णायक सेट नदालने 7-6 अशा फरकाने जिंकला.

दुसर्‍या एका सामन्यात एंद्रीव ने साइप्रसच्या मार्कस बगदातिसचा 2-6, 6-1, 6-3, 6-4 असा पराभवे केला.

चोथ्या फेरितील आणखी एका सामन्यात जोकोविच ने फर्नान्डो वर्डेस्कोचा 6-3, 6-3, 7-6 असा सरळ सेटमध्ये पराभव सलग दुसर्‍यांदा उपांत्यपूर्व फेरित प्रवेश केला.

23 व्या क्रमांकावर असलेली मोया ने स्वीडनच्या योनस यार्कमॅनचा 7-6 6-2 7-5 असा पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.

जागतिक क्रमावारीत अव्वल असलेला स्विझर्लंडचा रोजर फेडरर रशियाचा निकोलाई देविदेन्को अर्जेंन्टीनाचा गुलेरमा कनास व स्पेनचा टामी रोब्रेडो याआधीच उपांत्यपूर्व फेरित दाखल झाले आहेत.