सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By
Last Updated : गुरूवार, 24 डिसेंबर 2015 (13:03 IST)

बॉलीवूड 2015 : अभिनेत्यांचा स्कोरकार्ड

सलमान खान 
2015 सलमान खानसाठी आनंद घेऊन आला आहे. न्यायालयात चालत असलेल्या प्रकरणातून त्याला सुटका मिळाला आहे तर दुसरीकडे त्याने आपल्या करियरचे शिखर गाठले आहे. 'बजरंगी भाईजान' त्याच्या करियरचे सर्वात हिट चित्रपट साबीत झाले. 300 कोटी क्लबमध्ये त्याला एंट्री मिळाली आहे. दुसरे चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'ला अपेक्षांपेक्षा कमी यश मिळाले आहे, पण हा सलमानचाच कमाल होता की एवढ्या कमजोर चित्रपटाला देखील त्याने दोनशे कोटी रुपये मिळवून आणले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाहरुखशी त्याची मैत्री अजून घट्ट झाली आहे. 
रिलीज : 2  (बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो)
ब्लॉकबस्टर : 1
सुपरहिट : 0
हिट : 1 
औसत : 0
फ्लॉप : 0
 
 

शाहरुख खान 
वर्षाच्या शेवटी शाहरुख खान 'दिलवाले' घेऊन हाजिर झाला. 'दिलवाले' सिनेमाघरांमध्ये चालत आहे आणि हे कुठपर्यंत पोहोचते हे सांगणे अद्याप अवघड आहे.  
रिलीज : 1 (दिलवाले)
ब्लॉकबस्टर : 
सुपरहिट : 
हिट : 
औसत : 
फ्लॉप : 

अजय देवगण   
'हे ब्रो'मध्ये थोड्याच सेकंदांसाठी दिसणारा अजय देवगणची हीरो म्हणून 'दृश्यम' रिलीज झाली. फिल्म उत्तम होती, पण 'बजरंगी भाईजान'मुळे ती जास्त टिकू शकली नाही. जर रिलीज टाइमिंग योग्य असता तर तो चित्रपट देखील हिट झाला असता. तरी देखील अजय आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला.   
रिलीज : 1 (दृश्यम)
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 0
औसत : 1 
फ्लॉप : 0

अक्षय कुमार 
काय अक्षय कुमार नावाच्या सितार्‍याची चमक आता कमी झाली आहे? असे प्रश्न येणे स्वाभाविक आहे कारण या वर्षी अक्षयने वेग वेगळ्या प्रकारचे चार चित्रपट केले, पण चित्रपटांनी उमेदीपेक्षा कमीच प्रदर्शन केले. बेबी सारखे उत्तम चित्रपट देखील अक्षया यश देऊ शकले नाही. याचे काय कारण? अक्षयलाच याचे उत्तर शोधावे लागणार आहे. एकूण खिलाड़ी कुमारचा खेळ यावर्षी चालला नाही.  
 
रिलीज : 4 (बेबी, गब्बर इज़ बैक, ब्रदर्स, सिंह इज़ ब्लिंग)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0 
हिट : 0 
औसत : 1 
फ्लॉप : 3

वरूण धवन
2015मध्ये तर वरूणचा जादू चालला. त्याने अशी अदाकारी दाखवली की त्याने आपल्या बरोबरीच्या नायकांनासुद्धा मागे सोडले. 'बदलापुर'मध्ये त्याने दाखवून दिले की त्यालाही अॅक्टिंग येते. 'एबीसीडी 2'ला 100 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री देऊन त्याने हे साबीत केले की तो ही स्टार आहे. दिलवालेचे परिणाम येणे अद्याप बाकी आहे.   
रिलीज : 3 (बदलापुर, एबीसीडी 2, दिलवाले)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0  
हिट : 2
औसत : 0  
फ्लॉप : 0

रणबीर कपूर 
कपूर खानदानच्या या अॅक्टरमध्ये भरपूर कौशल्य आहे पण त्याने निवडलेल्या चित्रपटांवर आता प्रश्न उभे झाले आहे. हा वर्ष रणबीर लवकरच विसरण्याचा प्रयत्न करेल. तिन्ही चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरले. 'बॉम्बे वेलवेट' सारखे महागडे चित्रपट असफल ठरल्याने बॉलीवूडमध्ये अनिश्चितता निर्माण झाली. 'रॉय' का केली? हे प्रश्न आज देखील रणबीरचे चाहते विचारत आहे. 'तमाशा' चांगले चित्रपट होते, पण हे जास्त बजटमुळे गोत्यात गेले. आम्ही सर्व उमेद करू की पुढीलवर्ष रणबीरसाठी भरपूर यश घेऊन येईल.  
रिलीज : 3 (रॉय, बॉम्बे वेलवेट, तमाशा)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0  
हिट : 0
औसत : 0  
फ्लॉप : 3

रणवीर सिंह
अभिनेतेच्या रूपात रणवीर सिंहचा अभिनय दिवसंदिवस उत्तम होत आहे. 'दिल धड़कने दो'मध्ये त्याची एनर्जी बघण्यासारखी होती तर  'बाजीराव मस्तानी' मध्ये त्याचा अभिनय बघून टीका करणार्‍या लोकांच्या तोंडावर ताळे लागले जे म्हणत होते की रणवीरला अभिनय येत नाही.  'दिल धड़कने दो'ने कमाल दाखवले नाही पण 'बाजीराव' अद्याप सिनेमाघरांमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे.   
रिलीज : 2 (दिल धड़कने दो, बाजीराव मस्तानी)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0  
हिट : 0
औसत : 0  
फ्लॉप : 1 

अमिताभ बच्चन 
बरेच चित्रपट आणि वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन अजून ही नवीन नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तीमध्ये गजबची प्रतिभा लपलेली आहे. 'पीकू'मध्ये तर अमिताभ यांनी कमालीचे काम केले आहे. शमिताभमध्ये देखील त्यांची अदाकारी बघण्यासारखी होती.  
रिलीज : 2 (शमिताभ, पीकू) 
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0  
हिट : 1
औसत : 0  
फ्लॉप : 1

आमिर खान 
आमिर खान 2015मध्ये स्क्रीनवर जास्त दिसला नाही पण त्याची आवाज नक्कीच सर्वांनी ऐकली. 'दिल धड़कने दो'मध्ये त्याने प्लूटो मेहरा नावाच्या कुत्र्याला आपली आवाज दिली ज्याचे चित्रपटात महत्त्वाचे काम होते. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर देखील तो चर्चेत राहिला.  
 
रितिक रोशन
माहीत नाही ऋत्विक रोशन एवढे कमी चित्रपट का करतो? 2015मध्ये देखील एकही चित्रपटात तो दिसला नाही. आता त्याने आपल्या कामाचा वेग वाढवला आहे. 2016मध्ये दोन चित्रपट होण्याची शक्यता आहे.  

शाहिद कपूर 
बर्‍याच मुलींशी प्रेम केल्यानंतर शाहिद कपूरने 2015मध्ये मीरा राजपूतशी विवाह केला, पण फ्लॉप चित्रपटांना तो ही रोखू शकला नाही. मोठ्या उमेदने त्याने 'शानदार' केली होती, बॉक्स ऑफिसवर फिल्म टाय-टाय फिस्स साबीत झाली.    
रिलीज : 1 (शानदार)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0  
हिट : 0
औसत : 0  
फ्लॉप : 1