गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (11:53 IST)

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान देतील मार्गशर्न, या प्रकारे करा नोंदणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील 'परीक्षा पे चर्चा' करणार आहे. या कार्यक्रमात भारतच नव्हे तर इतर देशातील विद्यार्थ्यांना भाग घेण्याची संधी मिळेल. कार्यक्रमात अभिभावक देखील सामील होऊ शकतील. या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या-
 
'परीक्षा पे चर्चा 2021' यात सामील होण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, ऑस्ट्रेलिया सारखे देशातील विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत आहे. यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 14 मार्च, 2021 आहे. विद्यार्थिर्यांना परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी व मार्गदर्शन देण्यासाठी मोदी यंदा व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे जगभरातील विद्यार्थींसोबत जुळणार आहे. यंदा कार्यक्रम ऑनलाइन असून यात अभिभावक देखील सामील होऊ शकतील. पीएम मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की 'परीक्षा पर चर्चा' कार्यक्रमात गंभीर विषयांवर मजेदार चर्चा होईल. या कार्यक्रमात पीएम मोदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देखील देतील.
 
या प्रकारे करा रजिस्ट्रेशन 
'परीक्षा पर चर्चा 2021' कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला https://innovateindia.mygov.in वर लॉग इन करावे लागेल. 
नंतर त्या पेजवर Participate या बटणावर क्लिक करावे लागेल. 
येथे आवश्यक ती माहिती भरुन कार्यक्रमासाठी आपलं रजिस्ट्रेशन करता येईल. 
 
ज्यांच्याकडे इंटरनेट, आयडी किंवा मोबाइल नंबर नसेल त्यांनी काय करावे? 
असे विद्यार्थी देखील कार्यक्रमात भाग घेऊ शकतात. 
यासाठी शिक्षक लॉगिनच्या माध्यमातून भाग घेता येईल. 
शिक्षक लॉगिनद्वार‍ विद्यार्थी आपली माहिती देऊन नोंदणी करु शकतात. 'शिक्षक के माध्यम से भाग लेने' असलेल्या टॅबवर क्लिक केल्यावर टीचर्स आपल्या द्वारे पाठवण्यात आलेल्या सर्व प्रविष्टी बघण्यात सक्षण असतील. 
 
कोण-कोण घेऊ शकतं भाग
या वर्षी होणार्‍या कार्यक्रमात केवळ 9वी, 10वी, 11वी व 12वी वर्गातील विद्यार्थी भाग घेऊ शकतात. 
विद्यार्थ्यांचे अभिभावक व शिक्षक देखील भाग घेऊ शकतात. 
परदेशातील विद्यार्थी ई-मेल आयडीवर पाठवण्यात आलेल्या ओटीपीच्या माध्यमाने रजिस्ट्रेशन करवू शकतील. 
विद्यार्थी त्यांच्यासाठी निर्धारित विषयांपैकी एकावर उत्तर पाठवू शकता.
विद्यार्थी कमाल 500 अक्षरांमध्ये पंतप्रधानांना आपले प्रश्न पाठवू शकतात. 
 
विद्यार्थी, शिक्षक व अभिभावकांना मिळेल पुरस्कार
पीपीसी 2021 यात निवडण्यात आलेले विद्यार्थी, पालक व शिक्षकांना पुरस्कार मिळेल.
विजेता म्हणून निवडून आलेल्या 15000 विद्यार्थी, 250 पालक व 250 शिक्षकांना पुरस्कृत केले जाईल.
विजेतांना पंतप्रधनांसोबत परीक्षा पे चर्चा च्या व्हर्चुअल कार्यक्रमात थेट सामील होण्याची संधी मिळेल. 
प्रत्येक विजेत्याला विशेष रूपाने डिजाइन केलेलं प्रशंसा प्रमाण पत्र मिळेल.
प्रत्येक विजेत्याला एक विशेष परीक्षा पे चर्चा किट देखील मिळेल.
काही विद्यार्थ्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद व त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. 
विशिष्ट विजेत्यांना पंतप्रधनांसह त्यांची ऑटोग्राफ असलेली फोटो व डिजीटल स्मारिका देखील मिळेल.