बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (12:55 IST)

Slow Internet Speed इंटरनेटची मंदावलेली गती जाणवत असेल, तर या प्रकारे वाढवा स्पीड

बरेच लोक एका वर्षापेक्षा जास्त काळापासून वर्क फ्रोम फोम करत आहे. कोरोनाव्हायरस यामागील कारण आहे. आणि आपण देखील घरून कार्य करत असाल तर आपल्याला देखील लॅपटॉप, संगणक आणि इंटरनेट संबंधित काही समस्या येत असतील. त्यापैकी सर्वात सामान्य समस्या डेटा स्पीड आहे. अनेकदा काम करताना स्पीड कमी होऊन जाते. सर्व्हिस प्रोवाइडरला तक्रार केल्यास ते प्लान अपडेट करण्याचा सल्ला देतात. त्याने देखील फारसा फरक पडत नाही उलट खिश्यावर भार पडतो. अशात आम्ही असे काही टिप्स देत आहोत ज्याने आपण एक्स्ट्रा पैसे खर्च न करता देखील आपल्या लॅपटॉप किवा कम्प्यूटरची स्पीड वाढवू शकता.
 
हिस्ट्री क्लियर करा
हे स्पष्ट आहे की आपण इंटरनेटवर कार्य करता तेव्हा आपण Google किंवा इतर साइटवरील सर्च देखील करता. याने आपल्या हिस्ट्रीत वाढ होत राहते. परिणामस्वरुप स्टोरेज भरुन जातं. तसंच आणखी एक म्हणजे कुकीज. ही टेक्स्ट फाइल असते. याने देखील जागा भरते. जितक्या अधिक वेबसाइटवर विजिट कराल तेवढ्याच कुकीज वाढतील. याने इंटरनेटची स्पीड कमी होते. म्हणून वेळोवेळी आपल्या सिस्टमवरुन हिस्ट्री आणि कुकीज क्लिअर करत राहावी.
 
वेबसाइटवर देखील समस्या उद्भवू शकतात
जर इंटरनेट हळु होत असेल तर तुमच्या सिस्टम किंवा इंटरनेटमध्ये समस्या आहे असे नाही. आपण ज्या साइटला उघडण्याचा प्रयत्न करीत आहात त्यात काही अडचणी असू शकतात. याचे कारणं वेगवेगळे असू शकतात. तसंच अनेकदा साइट उघडण्यास वेळ लागतो कारण एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोक त्या ‍साइटवर विजिट करु इच्छित असतात. याने गती मंदावते.
 
सिस्टम मेकॅनिक सॉफ्टवेअर
सिस्टम मेकॅनिक सॉफ्टवेअर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवातीला मोफत मिळते नंतर यासाठी पैसे मोजावे लागतात. याने कॉम्प्युटरचा दबाव कमी होण्यास मदत होते. याने कुकीज आणि इतर समस्या देखील सुटतात. हे सॉफ्टवेअर इतके उपयुक्त आहे की हे आपले खराब वाय-फाय कनेक्शन देखील अनुकूलित करेल.
 
वायफाय राउटर तपासणे आवश्यक आहे
वायफायची देखील एक रेंज असते, असे नव्हे की पूर्ण घरात आपल्याला एकसारखी स्पीड मिळते. यासाठी राउटर देखील तपासावे. सोबतच त्याला उत्तम क्वालिटीची केबल अटैच करावी. मजबूत केबलमुळे आपल्याला उत्तम सिग्नल आणि चागंली स्पीड मिळते. कधीकधी असे होऊ शकते की राउटरमध्ये अडचण आल्यामुळे कनेक्शन वारंवार खंडित होत असतं. यासाठी आपल्या केवळ एकदा राउटर बंद करुन पुन्हा ऑन करायचे आहे.
 
इंटरनेट सर्व्हिस आपली समस्या असू शकते. म्हणून सर्व्हिस प्रोवाइडरला देखील तपासा. आपलं वर्तमान प्लान चेक करा. चांगल्या स्पीडसाठी अपग्रेड करण्याची आवश्यकता भासत असल्यास नक्की करा. पीसी किंवा लॅपटॉप अपग्रेड करण्याची गरज देखील असू शकते. सतत सिस्टम वापरत असल्यामुळे वेळोवेळी अपग्रेड करण्याची गरज असते.