शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: परभणी , शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 (10:39 IST)

अजित पवारांविरुद्ध गुन्हा दाखल, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली

आचारसंहितेच्या काळात गंगाखेड येथे सापडलेल्या 4 लाख 85 हजार रुपयांच्या रोकड प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारांवर आचारसंहितेचा भंग केलाचा आरोप आहे.

अजित पवार यांच्या बागेत रोकड सापडली होती. परंतु हा पैसा पक्षाचा निधी होता असे स्पष्‍टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिल असले तरी कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. चौकशीसाठी‍ आपण पो‍लिसांना सहकार्य करू असेही पवारांनी कोल्हापूर येथील सभेत सांगितले होते.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे परभणीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणामुळे ऐननिवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.