आदित्य ठाकरे यांची इचलकरंजीत आज सभा
इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवगर्जना जंगी जाहीर सभा संत नामदेव भवन मैदान याठिकाणी सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजता आयोजित केली आहे. तरी या तीनही मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांसह शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शिवउद्योग सेनेचे, वाहतूक सेनेचे, महिला आघाडी, युवासेना, कामगार सेना याचबरोबर सर्व संघटनेचे पदाधिकारी व मतदार बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार मुरलीधर जाधव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.