शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: उल्हासनगर , सोमवार, 13 ऑक्टोबर 2014 (12:28 IST)

काँग्रेसची अवस्था उदंरासारखी होणार - अमित शहा

महाराष्ट्रातील जनतेने विश्वास ठेवून काँग्रेसला निवडून दिले. मा‍त्र गेल्या 15 वर्षात काँग्रेस- राष्ट्रवादीने 11 लाख 88 हजार करोड रुपयांचा घोटाळा केलेला आहे. जनतेने बहुमत देऊन वाघाचे बळ ज्या पक्षाला दिलेले त्यांनी जनतेचा विश्वासगात केला आहे. आता त्यांची अवस्था उंदरासारखी होणार असल्याची काँग्रेस पक्षावर टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. 
 
शनिवारी रा‍त्री उल्हासनगर येथील कुमार लॉन्स या मैदानात उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेत अमित शहा यांनी वरील टीका केली. 
 
एकेकाळी महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य होते, शहरीकरण, सिंचन, रोजगार, सहकार चळवळ, साखर कारखाने, रस्ते या बाबत महाराष्ट्र सतत आघाडीवर होता. मात्र 15 वर्षात 20 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, घोटाळे वाढले असून आता दोन्ही काँग्रेसला राज्यातून देखील हद्दपार असे आवाहन त्यांनी केले.