शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 13 ऑक्टोबर 2014 (16:17 IST)

पंतप्रधानांनी भाजपला केले हायजॅक- अजित पवार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला हायजॅक करून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (सोमवार) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. 
 
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी थंडावणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पवार कुटुंबीयांनी बारामतीतील लोकांना गुलाम केल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता, त्याला अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, देशातील याआधीच्या पंतप्रधानांनी बारामती मॉडेलचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी आमच्याबद्दल खोटा प्रचार करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
 
पवार म्हणाले. नरेंद्र मोदींनी सर्व पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केले आहे. भाजपच्या प्रचारात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कुठेच कसे दिसले नाही, असा सवाल ही पवार यांनी केला.