बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 14 ऑक्टोबर 2014 (18:01 IST)

भाजप उमेदवाराच्या कार्यालयातून सहा लाख जप्त

शिवसंग्राम संघटनेच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्या प्रचार कार्यालयात सहा लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. भारती लव्हेकर या भाजपच्या तिकीटावर मुंबईतील वर्सोवा येथून निवडणूक लढवत आहेत.

बुधवारी राज्यात 288 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने विविध भागातील उमेदवारांच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. या दरम्यान भारती लव्हेकर यांच्या कार्यायावरही छापा टाकल्यानंतर ही सहा लाखाची रक्कम आढळून आले. ही रक्कम मतदारांना वाटपासाठी आणली नसून रॅलीतील गाड्यांचे भाडे देण्यासाठी आणले असल्याचे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.